Home विदर्भ उन्हाळी धान व मका खरेदी केंद्र सुरू करा – मिथुन मेश्राम

उन्हाळी धान व मका खरेदी केंद्र सुरू करा – मिथुन मेश्राम

0

सडक अर्जुनी,दि.२५ः- यंदाच्या रबी हंगामात गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश भागात उन्हाळी धान पिकांसह मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या पिकांची पुढील काही दिवसांत कापणी व मळणी सुरू होण्याची शक्यता आहे.या परिस्थितीत मळणी पूर्ण धान पिकांसह मका पिकाच्या खरेदीसाठी शासनाने तात्काळ आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी गोंदिया जिल्ह्याचे राका (शरद पवार) चे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.सविस्तर असे काय गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी इटिया डोह धरणाचे सिंचन सुविधा सह अन्य सिंचन सुविधा अंतर्गत उन्हाळी धान पिकांसह मका पिकाची लागवड केली जाते. यावर्षी ही लागवड जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात करण्यात आली असून लागवडीखालील पिकांची पुढील काही दिवसांत कापणी व मळणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शासनाच्या आधारभूत किंमत योजने नुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उन्हाळी धान पिकांसह मका पिकाची खरेदी होण्यासाठी संबंधित खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांत जोर धरू लागली आहे. तथापि खरेदी केंद्र सुरू होताच शेतकऱ्यांना संबंधित केंद्र अंतर्गत धान पिकांसह मका पिकाची खरेदी होण्यासाठी ७/१२ ची एन ई एम एल पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेला किमान महिनाभर कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांची धान खरेदी लांबणीवर पडत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान लांबणीवर पडलेली धान खरेदी शेतकऱ्यांकडे गोदाम सुविधा नसल्याने मळणी झालेल्या पिकांची नुकसान होण्याची भीती आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेता शासनाने उन्हाळी धान पिकांसह मका पीक खरेदी साठी तात्काळ आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी मिथुन मेश्राम यांनी केली आहे.

Exit mobile version