जिल्हास्तरीय सैनिक मेळावा 3 मार्चला

0
16

गोंदिया,दि.23 : गार्ड रेजिमेंटल सेंटर कामठी व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सैनिक मेळावा शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात येत आहे. या सैनिक मेळाव्यात सेना चिकित्सालय कामठी येथील डॉक्टर मार्फत वैद्यकीय तपासणी, डिआईएवी पोर्टलवर नोंदणीकरण व सी.एस.डी. सेवा उपलब्ध होणार आहे. येतांना आपल्या सोबत पीपीओ, बँक पासबुक ऑनलाईन नोंदणीकरीता घेऊन यावे. तरी गोंदिया जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरमाता व वीरपत्नी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घ्यावा.

       तसेच माजी सैनिक/माजी सैनिक विधवांचे पेन्शन संबंधीत त्याचप्रमाणे रेकॉर्ड ऑफिस संबंधीत समस्यांचे निराकरण गार्ड रेजिमेन्ट अभिलेख कार्यालय कामठी द्वारा बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गोंदिया येथे केले जाईल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,गोंदिया यांनी केले आहे.