Home विदर्भ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्तन कर्करोग निदान कक्षाची सुरुवात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्तन कर्करोग निदान कक्षाची सुरुवात

0

गोंदिया, दि.9 :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाअंतर्गत राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात आले. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे ८ मार्च २०२३ रोजी बाह्यरुग्ण विभागामध्ये स्तन कर्करोग निदान कक्षाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

         सदर कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. व्ही.पी. रुखमोडे, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरिररचनाशास्त्र विभाग, डॉ. रितेश बोदडे, सहयोगी प्राध्यापक, शल्य चिकित्साशास्त्र, डॉ. स्वप्नील रंगारी, नोडल अधिकारी, स्तनाचा कर्करोग जनजागृती व उपचार अभियान हे उपस्थित होते.

        जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून ८ मार्च २०२३ पासून स्तन कर्करोग निदान कक्ष हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभागात दर बुधवारी दुपारी १२:०० ते ०२:०० या वेळेत चालविण्यात येणार आहे. सदर निदान कक्षामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहतील.

         सदर अभियानाअंतर्गत स्तन कर्करोग तपासणी करुन या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील सर्व महिलांनी घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले आहे. या जनजागृती मोहिमेअंतर्गत संस्थेतील डॉक्टर्स, समाजसेवा अधिक्षक, इंटनर्स हे जिल्ह्यातील गांवामध्ये जाऊन आशा वर्कर यांच्या मदतीने महिलांना स्तनामध्ये होणाऱ्या कर्करोगाबाबत जनजागृती करतील तसेच त्यांच्याद्वारे महिलांना सेल्फ ब्रेस्ट चेकअप बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Exit mobile version