Home विदर्भ तांत्रिक शिक्षण आणि मराठी भाषेवर व्य़ाख्यानाचे आयोजन उत्साहात

तांत्रिक शिक्षण आणि मराठी भाषेवर व्य़ाख्यानाचे आयोजन उत्साहात

0

नागपूर,दि.13ः-” मराठी भाषा पंधरवडा ” आणि महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवन्तराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय साहित्य परिषद (विदर्भ प्रांत) च्या वतीने आज (१२ -३- २०२३) नागपूर येथील धरमपेठ शाळेच्या ‘शहापूरकर सभागृहात ‘ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान विषयाचे सिद्धहस्त प्राध्यापक आणि लेखक डॉ. मधुकर आपटे हे प्रमुख वक्ता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल मोकद्दम होते.
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून देता येईल काय या अनुषंगाने ‘तांत्रिक शिक्षण आणि मराठी भाषा’ या विषयावर डॉ. आपटे ह्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तसेच मौलिक विचार मांडले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. मोकद्दम ह्यांनी मराठी माध्यमाचे समर्थन केले परंतु, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी या विषयांचे शिक्षण मराठीत देताना कोणत्या व्यावहारिक अडचणी येऊ शकतात याकडे लक्ष वेधले. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन आणि स्वागतोपचारांनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाठक ह्यांनी साहित्य परिषदेची भूमिका विशद केली . कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश एदलाबादकर यांनी प्रास्ताविकातून, प्रतिपादनासाठी असलेल्या व्याख्यानाच्या विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली . अखिल भारतीय साहित्य परिषद ,विदर्भ प्रांताचे अध्यक्ष ऍड.लखनसिंह कटरे यांनी समारोपीय भाष्य करताना कायदा विषयाचे शिक्षण सुद्धा मराठीतून होणेबाबत सोदाहरण मांडणी केली व आभार मानले . डॉ. सुरुची डबीर यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version