Home विदर्भ मुंडीपार येथे भव्य जंगी शंकरपट उत्साहात,दोन लाखांच्या बक्षिसांचे झाले वितरण

मुंडीपार येथे भव्य जंगी शंकरपट उत्साहात,दोन लाखांच्या बक्षिसांचे झाले वितरण

0

गोरेगांव : तालुक्यातील मुंडीपार येथे बैलांच्या इनामी शंकरपटाचे आयोजन डुक्करबोळीच्या भव्य पटांगणावर दिनांक 22 व 23 मार्च रोजी करण्यात आले होते. या शंकरपटात 150 च्या जवळपास बैलजोड्या सहभागी झाल्याने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंडीपार येथील भव्य पटांगनावरील बैलांचा शंकरपट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे.22 मार्च रोजी शंकरपटाचे उद्घाटन कार्यक्रम माजी पालकमंत्री इंजी. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली , उद्घाटक जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते व सिग्नलपुजक जि.प.सदस्य ससेंद्र भगत व माजी समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य व गटनेता रामेश्वर माहारवाडे,माजी नगर पंचायत उपाध्यक्ष सुरेश राहांगडाले,सरपंच प्रेमलता राऊत,उपसरपंच बी.जी.कटरे,माजी उपसरपंच जावेद (राजा)खान , सर्व ग्रा.पं.सदस्य व मान्यवर नागरिक उपस्थित होते.शंकरपटाचे बक्षीस वितरण 23 मार्च रोजी सायंकाळी जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत,जि.प.सदस्य ससेंद्र भगत,विस्तारअधिकारी(पंचायत)टी.डी.बिसेन,नायब नाझीर(तहसिल)दिलीप कटरे,माजी सरपंच बबई सोमेश राहांगडाले,क्षत्रिय पोवार समाज संघटना अध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे विजेत्या जोडीला 15555 रुपये द्वितीय 12222 रुपये, तृतीय 9999 रुपयांचे यासह प्रत्येक क्रमांकपर्यंत विजेत्या बैल जोडीना बक्षीस देण्यात देण्यात आले. शंकरपटात 150 बैल जोडी मालकांनी सहभागी घेतला. शंकरपट यशस्वीकरिता ग्राम मुंडीपार शंकरपट समितीचे आयोजक अध्यक्ष सुमेंद्र धमगाये,उपाध्यक्ष जावेद(राजा)खान, सचिव दानेश्वर राऊत,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे,वासुदेव राहांगडाले, उमेंद्र ठाकुर ,रोहित पांडे,बबलु चौथरी,शंकर वैद्य,राजेंद्र बिसेन,यांच्यासह सर्व समिती सदस्यगण तथा गावातील समस्त नागरिक व युवकांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रम यशस्वी व शांततेत पार पडले.

Exit mobile version