26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे जागतिक पुस्तक दिन साजरा

आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे जागतिक पुस्तक दिन साजरा

0
35

गोरेगाव,दि.२३ एप्रिल-तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक २३ एप्रिल ला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात वाचक व शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले तर उदघाटक मोहाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिक्षक वाय.एफ.पटले, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथ्रमित्र वाय.डी.चौरागडे,सदस्य हिरालाल महाजन,डि.आर.चौरागडे,ग्रामपंचायत सदस्य भिवराज शेंडे, सामाजिक कार्यकर्ता तेजलाल कावडे, शिवराम मोहनकार,चुळामन पटले, मुकेश येरखडे,आशा चेचाने,दुर्गेश चेचाने आदी उपस्थित होते.
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिन आहे. जगातील पहिले व एकमेव व्यक्ती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले आपणही वाचक होऊण आपली ज्ञानसंपदा वाढवुया असे मान्यवरानी मार्गदर्शनातुन सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व आभार सुभाष चौरागडे यांनी केले कार्यक्रमात वाचक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.