Home विदर्भ ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ३ वर्षांचा थकीत बैठक भत्ता

ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ३ वर्षांचा थकीत बैठक भत्ता

0

“सरपंच परिषदेच्या मागणी व पाठपुराव्याला यश”

3.16 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त

गोंदिया:  ग्राम पंचायतीच्या मासिक बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांना बैठक भत्ता मिळतो. परंतु सण २०१९ नंतर मागील ३ वर्षाचा भत्ता सदस्यांना अदा करण्यात आला नाही. याबादची मागणी सदस्यांकडून जिल्हा परिषद व शासन दरबारी वारंवार करण्यात येत होती. राज्यात ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना सरपंच परिषद मार्फत याविषयी वेळोवेळी मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अखेर सदर मागणी लक्षात घेत राज्य प्रकल्प संचालक राष्टीय ग्रामस्वराज अभियान पुणे यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता अदा करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याबाबदची माहिती ग्रामपंचायत स्तरावरून मागविण्यात आली व ३.१६ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाला.

सर्व तालुका स्तरावरील प्राप्त माहिती प्रमाणे एकूण ५४६ ग्रामपंचायतींना सण २०१९-२० करीता ४५८६ सदस्यांना ५०२३३ उपस्थित दिवसांकरीता एकूण १.००४ कोटी, सण २०२०-२१ करीता ४५७१ सदस्यांना ५७४५२ उपस्थित दिवसांकरीता एकूण १.१४ कोटी तसेच सण २०२१-२२ करीता ४५८२ सदस्यांना ५०४८७ उपस्थित दिवसांकरीता एकूण १.००९ कोटी याप्रमाणे सदस्यांच्या एकूण १५८१७२ उपस्थित दिवसांकरीता ३.१६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद गोंदिया ला निधी प्राप्त झाला असून लवकरच तालुका स्तरावरून सदस्यांना वाटप करण्यात येणार असल्याबाबदची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर यांनी दिली. तसेच प्रलंबित मागणी ऐकून घेत ग्रामीण क्षेत्रातील तळागळात कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना सन्मान स्वरूपी देण्यात येणारा बैठक भत्ता मंजूर केल्याबद्दल सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तिजेश गौतम यांनी राज्य शासनाचे व जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version