Home विदर्भ कवी अँड. देवेंद्र चौधरी नेपाळ देशात होणार सन्मानीत तसेच पोवारी बोली च्या...

कवी अँड. देवेंद्र चौधरी नेपाळ देशात होणार सन्मानीत तसेच पोवारी बोली च्या कविता सादर करणार

0

तिरोडा: तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गजलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी हे नेपाळ देशातील बहुप्रतिष्ठित संस्था “शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, नेपाल द्वारा आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह – २०२३ मध्ये सन्मानीत तसेच पोवारी बोली च्या कविता सादर करणार आहेत.
आगामी ११ व १२ जून २०२३ रोजी नेपाल देशातील नेपाळगंज येथे “शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, नेपाल द्वारा विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह – २०२३ आयोजित केले आहे. सदर सन्मान समारोहात जगातील जवळपास ६० ते ७० देशातील साहित्यिक व समापांढुरना जसेवक यांची, त्यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील कामगीरी बघून त्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन दिवसीय सन्मान समारोहात तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गजलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी हे नेपाळ देशातील बहुप्रतिष्ठित संस्था “शब्द प्रतिभा बहुउद्देशीय फाऊंडेशन, नेपाल द्वारा आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह – २०२३ मध्ये सन्मानीत होणार असून आयोजक संस्थेने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विशेष कविसंमेलन देखील आयोजित केले असून कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना पोवारी बोली च्या कविता सादर करण्याची खास करून विनंती केली आहे.
हे विशेष की, कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी हे मागील वर्षी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून हा सन्मान त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे.

Exit mobile version