प्रामाणिक प्रयत्न हाच यशाचा मार्ग – डॉ. राजेश चांडक

0
22

सत्कार व निरोप समारंभा प्रसंगी व्यक्त केले मत
अर्जुनी मोरगाव – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कर्तृत्वात प्रामाणिकपणा असावा. प्रामाणिकपणाशिवाय कुणीही यशस्वी होऊ शकत नाही. या महाविद्यालयातील तीस वर्षाच्या सेवेत माझ्यासोबतच्या सर्व सहकार्याच्या सहकार्यानेच मी यशस्वी होऊ शकलो असे मत शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. राजेश चांडक यांनी व्यक्त केले.
डॉ. राजेश चांडक यांची साकोली येथील एस. चंद्रा महाविद्यालयात नुकतीच प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याने श्री दुर्गा शिक्षण संस्था, एस. एस. जायस्वाल महाविद्यालय आणि प्राध्यापक परिषदेच्या वतीने डॉ. राजेश चांडक यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुनकरणजी चितलांगे, प्रमुख पाहुणे सचिव मुकेश जायस्वाल, उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल, नंदकिशोर राठी, डॉ. कैलास गाडेकर, डॉ राजेश चांडक, सौ वर्षा चांडक, रमण चांडक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ईश्वर मोहुर्ले आणि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्व. शिवप्रसादजी जायस्वाल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रस्ताविकातून प्राध्यापक परिषदेचे सचिव डॉ. आशिष कावळे यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी व्यक्त करीत डॉ. राजेश चांडक यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. मनोगत व्यक्त करताना डॉ. गोपाल पालीवाल, डॉ. पी. एस. डांगे, प्रा. श्रीकांत नाकाडे यांनी डॉ. राजेश चांडक यांच्या विविध कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी बद्रीप्रसाद जायस्वाल यांनी महाविद्यालयाच्या उभारणीपासून डॉ. राजेश चांडक यांचे या महाविद्यालयाला मोठे करण्यात मोठा हातभार लागले असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ ईश्वर मोहुलें यांनी डॉ. राजेश चांडक हे केवळ शैक्षणिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान असल्याचे आणि स्वतः 50 पेक्षा जास्त वेळा त्यांनी रक्तदान केले असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ राजेश चांडक यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्प गुच्छ देऊन तसेच प्राध्यापक परिषदेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून लूनकरणजी चितलांगे यांनी डॉ राजेश चांडक यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ शरद मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.