
आता प्रशासनाला कुंभ करण्याची झोपेतून उठावाच लागेल: दिपेश अरोरा
गोंदिया : १४ जूलै, गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकातील मुख्य प्रवासी निवार्यात युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जयस्तंभ चौक हे शहराच्या मधोमधी असून येथील बस स्टॅन्ड हा खूपच घाणेरडा असून लोक इथं रात्रीच्या वेळेस दारू पितात, गुरढोरं डुकर इथं विस्टा करून घाण करतात, पावसाळ्यात चारही बाजूने पाणी पडतो, बस स्टॅन्ड खालच्या पातळीला असल्याने रस्त्यावरचा पूर्ण पाणी बस स्टॅन्ड मध्ये सिरतो, बसण्याच्या जागेवर पाणी पडतो आणि तिथं महिलांसाठी- पुरुषांसाठी प्रसाधन ग्रहाची व्यवस्था नाही आणि ह्या बस स्टॅन्ड वरून नागपूर जिल्हा , भंडारा जिल्हा, गोरेगाव तालुका, आमगाव तालुका, देवरी तालुका, सालेकसा तालुका पर्यंतचे लोक प्रवास करतात आणि त्यांना तासनतास एसटी बसची वाट पहावी लागतो अशा व्यवस्थेत प्रवाशांचं काय अवस्था होत असेल हे खूप विचारणी आहे.या अवस्थेवर काँग्रेस पक्षा च्या माध्यमाने वारंवार निवेदन देण्यात आले की इथली व्यवस्था महाराष्ट्राच्या ईडी सरकार व नगरपरिषद नगरपरिषद गोंदिया नी बरोबर करावी परंतु महाराष्ट्र ची इडी सरकार ही आमदार घेण्यात व पक्ष फोडण्यात व्यस्त आहे तर नगरपरिषद प्रशासन हे कुंभ करण्याची झोपेत आहे. त्यामुळे आज युवक काँग्रेस च्या नेतृत्वात शहर काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी विभाग काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी च्या सहकार्या ने सफाई अभियान करण्यात आला. व नगरपरिषद चे अधिकारी यांना बोलावून निवेदन देण्यात आले आणि त्यात मागणी करण्यात आली की लवकरात लवकर बस स्टॅन्ड मध्ये गट्टू लावून रंग मोठी करून प्रवासांसाठी बसण्याची व्यवस्था करावी, प्रसाधन ग्रह बनवावे आणि दिवसातून दोनदा बरोबर स्वच्छता ठेवावी अशी मागणी करण्यात आली. ही मागणी या जुलै महिन्यातच पूर्ण करावी असं ठणकावून सांगण्यातही आलं जर ही मागणी पूर्ण झाली नाही.तर शहरातील नागरिकांच्या सहकार्याने काँग्रेस पक्ष निरंतर सफाई अभियान करत राहील आणि जमा केलेला कचरा हा नगरपरिषद चे मुख्य अधिकारी यांच्या शासकीय बंगल्याच्या समोर टाकण्याचा काम करनार आणि जोपर्यंत प्रशासन मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे निरंतर करत राहून असेही सांगण्यात आला सफाई अभियान मध्ये प्रदेशचे सचिव अमर वराडे, शहर अध्यक्ष जाहिर अहमद, सेवादल अध्यक्ष इंजि राजीव ठकरेले, युवक कॉंग्रेस के पूर्व जिला अध्यक्ष अलोक मोहंती, एनएसयूआई जिलाअध्यक्ष हरिश तुलसकर, मंथन नंदेश्वर, जीवनलाल शरनागत, रंजीत गणवीर, सुनील भूंगाड़े, भारत खपर्डे, रुपाली ऊके, चित्रा लोखंडे,जाहिद सोलंकी, मनीष चौहान, कृष्णा बिभर, दीपक उके, राकेश पाटिल, ओमप्रकाश मचाडे, संदिप शेंडे इत्यादि कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित होते.




