दक्षिण पुर्व मध्य रेल्वेने जारी केले पत्र
देसाईगंज दि.20-अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्टेशन च्या वडसा रेल्वे सल्लागार समितीत शहरातील दहा जणांची नियुक्ती केल्याबाबत दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपुर च्या विभागीय कार्यालयाचे पत्र क्रमांक G27/SSC MEETING/23-24 अन्वये दि 6.6. 2023 ला वरिष्ठ विभागीय वाणीज्यीक व्यवस्थापक यांनी नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहे.नव नियुक्त वडसा रेल्वे सल्लागार समिती मध्ये मोतीलाल कुकरेजा,विनायक गरफडे,प्रितपालसिंग तुटेजा, डॉ.विष्णू वैरागडे,श्रीमती भारती उपाध्याय, मोहम्मद आरिफ शेख ,विकास प्रधान,लक्ष्मण रामानी,कन्हैयालाल डेंगानी, संतोष कुकरेजा या दहा जणांचा समावेश असुन सदर नियुक्ती दोन वर्षासाठी केल्याचे नियुक्ती आदेशात नमुद केले आहे.
नव नियुक्त वडसा रेल्वे सल्लागार समिती कार्यकारनीचे श्रेय गडचिरोली चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना देण्यात आले आहे.
समितीची असते अहम भुमिका
वडसा रेल्वे स्टेशन चा सर्वांगीन विकास साधण्यासाठी रेल्वे सल्लागार समितीची भुमिका अहम मानल्या जात आहे. वडसा रेल्वे सल्लागार समिती ने मागील सहा वर्षापासून दक्षिण पुर्व मध्य रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाय्रांकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केल्यानेच वडसा रेल्वे स्टेशनवर अनेक विकासात्मक योजना राबविण्यात आले आहेत हे विशेष.