( रचनाताई गहाणे यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन )
अर्जुनी मोर. :--तालुक्यातील प्रतापगड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे यांचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची घटना दि.10 ऑगस्ट रोजी घडली.11 ऑगस्ट ला मृतक विवाहीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची माहीती मिळताच भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चा च्या महामंत्री तथा जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी तात्काळ मृतकाच्या कुटृंबियांना भेट देऊन सांत्वन केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे ह्या 10 ऑगस्टला शेतात काम करायला गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला.लगेच कुटृंबियांना प्रा.आ.केंद्र गोठणगाव येथे नेले .प्राथमिक उपचारानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे हलविण्यात आले. तेथील उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया ला नेण्याची तयारी झाली असताना ग्रामीण रुग्णालय परिसरातच त्यांचा मृत्यु झाला.शवविच्छेदनानंतर ता.11 वाजता कढोली येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मृतक महिलेला सासु, सासरा, पती व दोन मुले आहेत.लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच असल्याची माहीती आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी कढोली येथे जावुन कुटृंबियांचे सांत्वन केले. व आर्थिक मदत सुध्दा केली.तसेच बचत गटाच्या माध्यमातून जिवन ज्योती जीवन विमा त्वरीत मिळावा. व शासनाच्या अन्य विभागाकडुनही त्वरीत आर्थीक मदत मिळावी म्हणुन भ्रमणध्वनी द्वारे संबंधीत अधिकारी यांना सुचना केली. सहा महीण्याच्या बाळाच्या आईचे सर्पदंशाने मृत्यु झाल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





