33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप यशस्वी…

जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप यशस्वी…

0
24

जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर,  गोंदिया चे आमदार विनोद अग्रवाल सह शिक्षणाधिकारी(प्राथ.) महेंद्र गजभिये यांची भेट..

गोंदिया, (दि. 15): जिल्हा परिषद अहमदनगर येथील समग्र शिक्षा कर्मचारी प्रसाद पोळ (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण)  हे आपल्या न्याय्य मागणीसाठी म.प्रा.शि.प.मुबई येथे उपोषण करीत असल्याने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील समग्र शिक्षा समवेशीत शिक्षण विभाग व सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी झाला असून संप मंडपाला जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, गोंदिया चे आमदार विनोद अग्रवाल व शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये सह विविध शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी भेट देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

आजचे लाक्षणिक संप प्रहार समावेशीत विशेष शिक्षक संघटने अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी समग्र शिक्षा यांचे आयोजित केले होते. अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा समन्वयक प्रसाद पोळ यांनी  काही वैक्तिक मागण्यांसह राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून इतर सुख सुविधा देण्यात यावे यासाठी उपोषण केले. उपोषणाला पाठिंबा जिल्हा गोंदिया च्या कर्मचाऱ्यांनी दिनांक १४/०८/२०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

या संपाला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी भेट देऊन उपस्थित संप कर्त्यांना यथोचित मार्गदर्शन केले व येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती व सर्व साधारण सभेत (GB) सर्व समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत ठराव घेऊन राज्य शासनाला पाठवू असे आश्वासन दिले. तसेच संपाला गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी भेट देऊन मागे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांचेशी मानधन वाढीबाबत जो प्रश्न विचारला होता तो येत्या डिसेंबर पर्यंत सुटला नाही तर हिवाळी अधिवेशनात यावर लक्षवेधी लावणार असे उपस्थितांना शब्द दिला. सोबतच दरमहा मिळणारे मानधन हे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत का येत नाही? याबाबत MPSP शी संपर्क करून जाब विचारणार असल्याचे देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

आजच्या संपाला काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे यांनी देखील भेट देऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला व जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांच्या निवासस्थानी यापुढे आंदोलन उभारू व या लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न सोडविण्यासाठी बाध्य करूया असे आपल्या संबोधनात आवाहन केले. तसेच आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर बावनकर, केदारनाथ गोटेफोडे, राजेंद्र निंबार्ते, मोरेश्वर बडवाईक, प्रवीण नरुळे,  म. रा. प्राथमिक शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, सहकार शिक्षक संघटनेचे रविकुमार अंबुले,  शिक्षक भारतीचे सुशील बन्सोड, नरेंद्र बांते, पेमेंद्र चौहान यांनी संपाला भेट दिली व यथोचित मार्गदर्शन करून कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आपला जाहीर पाठिंबा असून जेव्हाही गरज असेल तेव्हा तेव्हा शिक्षक संघटना या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे शब्द सर्वांनी उपस्थितांना दिले.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन- आजच्या संपाचे व आपल्या रास्त मागण्यांचे निवेदन या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना दिले त्यांनी तात्काळ सदर निवेदन शासनाला व वरिष्ठांना पाठविले.

शिक्षणाधिकारी आले प्रत्यक्ष संपस्थळी- शिक्षण विभागाचा संपूर्ण डोलारा ज्या समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांवर आहे त्याबाबतीत प्रशासन आज या कर्मचारी संपामुळे पूर्णपणे कोलमडली आहे असे प्रतिपादन जि. प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी सांगितले. ते स्वतः संपस्थळी आले व निवेदन स्वीकारले.

आजचे संप यशस्वी करण्यासाठी प्रहार समावेशीत विशेष शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश गजभिये, उपाध्यक्ष कल्पना राहुलकर, सचिव विनोद फुंडे, प्रमोद सिंगनजुडे, राजकुमार गौतम, मुक्ता पोगडे, दीपा बिसेन, प्रशांत गजभिये, विकास लिल्हारे, विशेषतज्ञ गजानन धावडे, प्रमोद खोब्रागडे, जिल्हा सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, कनिष्ठ अभियंता विकास कापसे, जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, विलास मलवार, साधनव्यक्ती सुनील बोपचे, विनोद परतेके, वशिष्ठ खोब्रागडे, सुरेन्द्र खोब्रागडे, सुनील ठाकूर, उर्मिला वैद्य, शारदा जिभकाटे, वसले विकास मिश्रा, योगेश हरिनखेडे, MIS समन्वयक श्रीकांत त्रिपाठी, स्वाती भोयर, डा.ए.ऑ. कैलास खोब्रागडे, विशेषतज्ञ प्रदीप वालदे, योगेश कापगते, व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.