उपजिल्हा रुग्णालय गटातुन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा,
प्राथमिक आरोग्य केंद्र गटातुन प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर, प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला यांची निवड तर
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र गटातुन गोंदिया तालुक्यातुन उपकेंद्र कोरणी, गोरेगाव तालुक्यातुन उपकेंद्र तुमखेडा, आमगाव तालुक्यातुन उपकेंद्र चिरचाळबांध, तिरोडा तालुक्यातुन उपकेंद्र नवेझरी, सडक अर्जुनी तालुक्यातुन उपकेंद्र घटेगाव,सालेकसा तालुक्यातुन उपकेंद्र भजेपार ,देवरी तालुक्यातुन उपकेंद्र चिपोटा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातुन उपकेंद्र येगाव यांचा केला सत्कार
गोंदिया- सार्वजनिक आरोग्य विभागाने 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थामध्ये मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य ना.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून जनमानसात आरोग्यसेवा अधिक सुंदर व स्वच्छ लोकांभिमुख करण्यासाठी 7 ते 14 एप्रिल दरम्यान “सुंदर माझा दवाखाना“ हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था जसे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आर्वेदिक दवाखाने व उपकेंद्र इत्यादी मध्ये सर्वांना समान गुणवत्तापुर्वक आरोग्य सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे तसेच सर्व आरोग्य संस्थांनी याविषयी जनजागृती निर्माण केली पाहिजे याबाबतचे ध्येय या संकल्पनेतून “सुंदर माझा दवाखाना“ उपक्रम सप्ताह राबविण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
“सुंदर माझा दवाखाना“ उपक्रमासाठी पुरस्कृत करण्यासाठी जिल्हास्तरावरुन उपजिल्हा रुग्णालय , तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रत्येक तालुक्यातुन एक उपकेंद्राची निवड करण्याचे आदेशित होते. सदर उपक्रमातंर्गत मार्गदर्शक चेकलीस्ट नुसार नोडल अधिकारी यांनी आरोग्य संस्थेचे पर्यवेक्षण करुन गुणाकंन देण्यात आले.
सप्ताह दरम्यान आरोग्य संस्थेमार्फत आंतर व बाह्य परिसर स्वच्छता, स्वच्छते विषयी प्रतिज्ञा, गावोगावी स्वच्छतेविषयी प्रभातफेरी, आरोग्य संस्थेअंतर्गत वार्ड, प्रसूती कक्ष, प्रयोगशाळा,,इंजेक्शन विभाग, औषधी विभाग, संगणक विभाग इ. विविध अंतर्गत कक्षाचे स्वच्छता, अभिलेख रेकॉर्ड व रजिस्टर अद्यायावत करून सुस्थिती ठेवणे, पिण्याच्या पाण्याच्या व बागेची स्वच्छता, विविध वन औषधी झाडे व बगीचा यांची यांना कटिंग करणे व सुशोभीकरण, राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम व विविध योजनेची जनजागृती अशी विविध उपक्रम सप्ताह दरम्यान राबविण्यातआली.
दि. 15 ऑगस्ट 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुशंगाने जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे जिल्हाधिकारि चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील , पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या उपस्थितीत आरोग्य संस्थाना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा उपस्थीत होते.
उपजिल्हा रुग्णालय गटातुन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, प्राथमिक आरोग्य केंद्र गटातुन प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर, प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला यांची निवड तर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र गटातुन गोंदिया तालुक्यातुन उपकेंद्र कोरणी, गोरेगाव तालुक्यातुन उपकेंद्र तुमखेडा, आमगाव तालुक्यातुन उपकेंद्र चिरचाळबांध, तिरोडा तालुक्यातुन उपकेंद्र नवेझरी, सडक अर्जुनी तालुक्यातुन उपकेंद्र घटेगाव,सालेकसा तालुक्यातुन उपकेंद्र भजेपार ,देवरी तालुक्यातुन उपकेंद्र चिपोटा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातुन उपकेंद्र येगाव यांचा केला सत्कार .
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम प्रसंगी आरोग्य संस्थेच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सहाय्यिका, स्टाफ नर्स तर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कडुन सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी पुरस्कार घेतला.