33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद पेटला, आंदोलनकर्त्यांनी नांदेड अकोला महामार्ग रोखला

वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद पेटला, आंदोलनकर्त्यांनी नांदेड अकोला महामार्ग रोखला

0
12

blank

वाशीम : मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने नव्याने चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतर ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत चिवरा परिसरातील ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत अकोला नांदेड महामार्ग रोखून धरला. यावेळी भाजपा आमदाराचा निषेध करण्यात आला.

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या २८ जून रोजीच्या बैठकीत जिल्ह्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच ४३० खाटांचे सोईसुविधायुक्त रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. चिवरा येथील ७७ एकर ‘ई-क्लास’ शेतजमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित होते. १०० विद्यार्थी क्षमतेचे, ४८५ कोटींचा निधी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा करण्यात आली. ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु माशी कुठे शिंकली, कुणास ठाऊक, जिल्हा प्रशासनाने सदर महाविद्यालयासाठी पर्यायी चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले.