मराठा समाजास कुणबी-ओबीसी आरक्षण देऊ नये,माळी समाज संघटनेचे आंदोलन

0
11

गडचिरोली:- गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना व अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तथा उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविण्यात आले.निवेदनात मराठ्यांना ओबीसी आरक्षणा मधून आरक्षण देऊ नये.) ओबीसींची जातीही जनगणना करण्यात यावी.एक ते चार वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरू नये शासकीयंत्र यंत्रणेमार्फत आरक्षण निष्कर्ष भरावी,जिल्हा परिषद व शासकीय शाळा कॉपरेट क्षेत्राकडे सोपवू नये आदी मागण्यांचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यांतील अंतरवली सराटे ता. अबड या गावी आरक्षणांच्या मागणीसाठी मराठा आंदोलना दरम्यान उपस्थित जमावावर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा निषेधही करण्यात आला.राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल.

सन २०२३ २४ हे शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात ओबीसींची ७२ वसतिगृहे लवकरच सुरू केली जातील असे जाहिर केले होते. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, अशा जिल्ह्यांमध्ये खासगी इमारती भाड्याने याबाबतही घोषणा करण्यात आली होती. शिवाय वस्तीगृहांची व्यवस्था होईपर्यंत विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू केली जाईल असेही म्हटले होते. परंतु आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. तरी लवकरात लवकर मुले व मुली यांच्यासाठी जिल्हावार स्वतंत्र सरकारी वसतिगृहे सुरू करण्यात यावीत.

राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे व इतर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शासनाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची अनु. जाती, अनु. जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त, विशेष मागास वर्ग तसेच मराठ्यांसहीत खुल्या जागांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत श्वेतपत्रिका काढावी. राज्यपातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असेेही आंदोलनादरम्यान सरकारकडे मागणी करण्यात आली.राज्य सरकारने ओबीसीविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरेल असा इशाराही दिला.याप्रसंगी भीमराज पात्रीकर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ गडचिरोली यांचे नेतृत्वात, गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना अध्यक्ष फुलचंद गुरनूले, कोषाध्यक्ष सुखदेव जेंगठे, सागर वाढई सचिव अ भा मा महासंघ, रंजीत बनकर आरमोरी तालुकाध्यक्ष जिल्हा माळी समाज संघटना, ईश्वर चौधरी कुरखेडा तालुकाध्यक्ष अ भा मा महासंघ, रस्से धानोरा तालुकाध्यक्ष अभामसं, भुजंगराव पात्रीकर आरमोरी तालुकाध्यक्ष अभामासं, योगेश सोनूले फुले दाम्पत्य प्रतिष्ठान, पुरुषोत्तम लेनगुरे भारतीय पिछडा शोषित संघटना, इतर सर्व ग.जि.माळी.स.संघटना कार्यकर्ते सुधा चौधरी, ज्योती जेंगठे, संध्या भेंडारे, चैताली चौधरी, मंगला मांदाडे, मनिषा निकाडे, प्रभा सोनुले, शुभांगी सोनुले, श्री कावळे, प्रभाकर कोटरंगे, अशोक शेंडे, किरण शेंडे, पुरूषोत्तम देशकर, गुरुदास बोरुले, मिलींद वाढई, तसेच प्रत्येक तालुक्यातील महिला व पुरुष कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.