6 सप्टेंबर 2023 चा कर्मचारी विरोधी शासन निर्णय रद्द करा

0
33

गोंदिया,दि.21ः– मार्च 2023 मध्ये झालेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमिवर दिलेल्या आस्वासनाची पुर्तता अद्यापपर्यन्त शासन स्तरावरुन करण्यात आली नाही.त्यामुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट उमटली आहे. तसेच शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील सर्व विभागातील वर्ग 1 ते 4 पर्यन्त कर्मचारी कंत्रााटी कामगार नऊ खाजगी कंपन्यांनकडून भरण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात सरकारी कर्मचारी राहणार नसून सर्व कंत्रााटी कामगार असतील अशा अफलातून शासनाच्या धोरणामुळे फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. शासनाच्या या आत्मघाती निर्णया विरुध्द दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे यांचे नेतृत्वात गोंदिया जिल्यातील शासकिय – निम शासकिय, जिल्हा परिषद, शिक्षक कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने केले.तसेच जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.निदर्शनाचे वेळी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे समवेत कमलेश बिसेन, संतोष तोमर, भगीरथ नेवारे, चंद्रशेखर वेद्य, राकेश डोंगरे, रमेश नागपल्लीवार, तु.बा.झंजाड, विस्वनाथ कापगते, नंदकिशोर गुरुभेले, संतोष तोमर, संतोष तुरकर, सुभाष खत्री, भगीरथ नेवारे, नंदलाल कावळे, सौरभ अग्रवाल, अभिजीत बोपचे, गुणवंत ठाकुर, अनमोल मेश्राम, पी.आर.रहांगडाले, प्रा.दर्शना बोरकर, सु.च.कुंभरे, डब्लु. आर. भांडारकर, डी.एम.कुंभारे, डी.आर.कटरे, आदी जिल्हयातील विविध विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने जिल्हयातील शासकिय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.