जिल्हा न्यायालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम

0
19

गोंदिया, दि.11 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ कार्यक्रमाचे आयोजन 10 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे होते. मार्गदर्शक म्हणून के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसिक रोग तज्ञ डॉ.लोकेश चिर्वतकर तर प्रमुख अतिथी म्हणून एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश-2 गोंदिया, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता एम. एस. चांदवानी, तसेच सर्व न्यायाधीश वर्ग उपस्थित होते.

         डॉ. चिर्वतकर यांनी मानसिक आरोग्य ढासळण्याचे कारणे व उपाय यावर मार्गदर्शन केले. तसेच मानसिक आरोग्य खालावले जाऊ नये म्हणून दैनंदिन जीवनचर्येमध्ये विपश्यना व व्यायाम करायला पाहिजे, जेणेकरून या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिकता ही सदृढ राहील असे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वानखेडे यांनी मानवी जीवनमानामध्ये मानसिक आरोग्याचे काय महत्त्व आहे याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली.

       कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचारी

अधीक्षक पी. बी. अनकर,  वरिष्ठ लिपीक ए. एम. गजापुरे, कनिष्ठ लिपीक सचिन कठाणे, सुशील गेडाम, खिलेश चौरे, प्रेक्शिक गजभिये, लोकेश दर्वे, आलेशान मेश्राम, प्रीती जेंगठे तसेच शिपाई बबलु पारधी, रोहित मेंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.