संत रविदास वॉर्डातील एका किराणा दुकानात लागली आग

0
18

*तिरोडा* : येथील राकेश बेलानी यांच्या किराणा दुकानात आग लागून नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.

त्यांच्या दुकानातुन धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येताच काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती होताच आजु बाजुच्या तरुणांनी घटनास्थळ गाठत आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केला. त्यानंतर लगेच तिरोडा नगरपरिषदेची अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशन दलानेही पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या घटनेत राकेश बेलानी यांचे किराणा दुकान जळून खाक झाले असून, दुकानातिल संपूर्ण साहित्यही खाक झाले.

सदर आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने राकेश बेलानी यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.