वेतनश्रेणीच्या मागणीसाठी जळगाव येथे 20नोव्हेंबरला होणाऱ्या आंदोलनाची धरणे आंदोलनाची नोटीस

0
15

गोंदिया,दि.24 – आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 20नोव्हेंबरला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे जळगाव येथील जनसंपर्क कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. सदर आंदोलनाची नोटीस गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोनाच्या माध्यमाने जिल्हाधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हाध्यक्ष चत्रुगण लांजेवार, बुधराम बोपचे, रवींद्र किटे, ईश्वरदास भंडारी, आशिष उरकुडे, महेंद्र भोयर, खोजराम दरवडे, दीप्ती राणे, विनोद शहारे उत्तम डोंगरे,धनेश्वर जमईवार, सुनील लिल्हारे, नरेंद्र कावडे यांचे वतीने सादर पूर्व सूचनेत अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करून लोकसंख्येचा सुधारित आकृतीबंध आणि वेतनश्रेणी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना त्वरीत लागू करा, कामगार विभागाच्या किमान वेतन समिती मार्फत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाचे दर पुर्न:निर्धारित करा, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन अनुदानासाठी असलेली कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट रद्द करुन शासनाने जबाबदारी स्वीकारून वेतन व राहणीमान भत्त्यासह सरसकट १०० टक्के लागू करावे, निवृत्तीनंतर जीवन जगण्याचा अधिकार म्हणून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागु करा,57 महिण्याची किमान वेतन फरकाचा एरिअस द्या, राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असलेल्या सर्व गट क व ड च्या पदांची ग्रा.पं. कर्मचाऱ्यांमधुन १० टक्के पदभरती तात्काळ करा , यासह ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या गेल्या कित्येक वर्षापासुन अन्य प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची त्वरीत पुर्त व्हावी. यावेळी धरणे आंदोलना समोर आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले मार्गदर्शन केले राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी 20नोव्हेंबर ला जळगाव येथील आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मोठ्या शामिल होण्याचे आव्हान केले .