गोंदिया, दि.24 : जिल्हा नियोजन समितीची सभा मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित केलेली आहे.
सभेची विषय सुची पुढील प्रमाणे आहे. जिल्हा नियोजन समिती सभा 23 जानेवारी 2023 च्या इतिवृत्तास मंजूरी देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत माहे मार्च 2023 अखेर झालेल्या खर्चास मान्यता प्रदान करणे (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र). जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा माहे सप्टेंबर 2023 अखेर पर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र) व अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. या सभेस सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी अद्ययावत माहितीसह नियोजित वेळेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.