समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हाच उद्देश

0
23

आमदार सहसराम कोरोटे यांचे प्रतिपादन.
ककोडी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

देवरी,दि.३०: रस्ते, पूल, शुध्द जल यासारख्या भौतिक सुविधांसोबत समाजातील वंचित घटक तसेच गरजू लोकांसाठी नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे कार्य मागील दोन महिन्यापासून विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या गावी शिबिराचे आयोजन करून नेत्र, हृदय, मधुमेह यासारख्या रोगांची नि:शुल्क तपासणी करीत आहो. मोतिया बिंदू सारख्या डोळ्यांच्या आजारावर नि:शुल्क ऑपरेशन आणि चष्मा वितरण केले जात आहे. समोर अनेक गावांमध्ये नि:शुल्क शिबिराचे आयोजन करण्यात येतील. कारण समाजाच्या शेवटच्या वंचित घटकापर्यंत तसेच गरजू लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हेच आमचे उद्देश असल्याचे प्रतिपादन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
देवरी तालुक्यातील छत्तीसगड सीमेला लागून असलेले ककोडी क्षेत्र आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त असून येथे शनिवारी (दि.२८आक्टोंबर )आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रयत्नातून भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन नागपूर येथील विशेषतंज्ञ डॉक्टर आणि गोंदिया येथील के.टी.एस. रुग्णालय येथील तज्ञ डॉक्टर यांच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचा ककोडी क्षेत्रातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरात उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी ते बोलत होते.
या शिबिरात नि:शुल्क डोळे, मधुमेह, हृदयविकार यांची तपासणी करण्यात आली. तसेच मोतीयाबिंदू ऑपरेशन आणि मोफत चष्मे यांचे वितरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि. प. सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे, पं. स. सदस्य रणजीत कायम, प्रल्हाद सलामे, मीना राऊत, उत्तम मडकाम, ब्रिजलाल सोनवणे, बबलू भाटिया, नरेंद्र शांडील, कमलेश नंदेश्वर, बळीराम कोटवार, इत्यादी प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रणजीत कासम यांनी करून उपस्थितांचे आभार ककोडी चे सरपंच मीना राऊत यांनी मानले.