मौदा येथे राष्ट्रीय बळीराजा महोत्सव व पुजन कार्यक्रम उत्साहात

0
4

मौदा,दि.15ः नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे मंगळवारला बळीप्रतिपदे निमित्त भारतीय सिंधू-कृषी सभ्यतेचा महानायक महात्मा बळीराजा महोत्सव व पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात बळीराजा समिती, मौदाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला.
कार्यक्रमात बळीराजाचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व बळीराजाचे प्रतिमेचे कॅलेंडर वाटप करून प्रा.राज शिराळे यांनी प्रामुख्याने बळीराजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.तसेच जगदिश वाडिभस्मे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन ईश्वर डहाके यांनी केले,तर प्रमोद पिसे,रवींद्र ठाकरे,चेतन वानखडे,अभिजित आखरे,दिगांबर बांगळकर,प्रतीक बांगळकर,दीपक निरगुडकर, धांडे व मौदा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.