गोंदिया:- संविधानिक मूल्यांना आपल्या जीवन आचरणात आणण्याचा संकल्प करण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य म्हणून “वॉक फॉर संविधान” रॅलीचे आयोजन संविधान मैत्री संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलामुलींचे वसतिगृह, नेहरू युवा केंद्र व सर्व सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर प्रतिमा चौक प्रशासकीय इमारती समोरून करण्यात आले. ही संविधान जागृती रॅली डॉ. आंबेडकर चौक ते सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय पर्यन्त करण्यात आले. या प्रसंगी विनोद मोहतुरे सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया, संविधान जागृती अभियान जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. दिशा गेडाम, नेहरू युवा केंद्र च्या श्रुती डोंगरे, ज्येष्ठ नागरिक वसंत गवळी, पौर्णिमा नागदेवे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.