सेवानिवृत्त सैनिक संंघटनेच्या आमसभेत हिवाळी अधिवेशनावरील मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन

0
15

गोंदिया,दि.28ः– गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघटनेची वार्षिक आमसभा 26 नोव्हेंबरला केसर फॅमिली गार्डन रेस्टॉरेंट एकोडी (गोंदिया) येथे जिल्हाध्यक्ष टी.एन.बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे राज्यअध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडली.या आमसभेला 100 च्यावर सदस्य व निमंत्रित पाहुण्यांची उपस्थिती होती.या आमसभेत सुरवातील शाहिद जवांनाना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.तसेच राज्यस्तरावर शासनासकडे प्रलंबीत असलेल्या मागण्याविषयी व संघटनेचे महत्व,ध्येय व उद्दिष्टांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.पुनर्नियुक्त माजी सैनिकांना शासकीय कर्तव्य पार पाडतांना उद्भवणाऱ्या समस्यावरही चर्चा करण्यात आली.यावेळी कर्मयोद्धे विशेषांकाचे वाटप करण्यात आले.सभासदांना संघटनेची टोपी (Cap)वितरीत करण्यात आली.तसेच सभेत नवीन 11 सदस्यांचे स्वागत करण्यात आले.त्यासोबतच अध्यक्षांच्या परवानगीने आलेल्या विषयावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.

या आमसभेत संघटनेचे राज्यअध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी आपल्या मनोगतातून संघटनेची संपुर्ण माहिती दिली.प्रभाकर पुस्तोडे यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष बिसेन यांनी जुन्या पेन्शन योजनेसह इतर मुद्यावर 14 डिसेंबर पासून पुकारण्यात आलेला बेमुदत संपाची माहिती दिली.नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपल्या संघटनेकडून होणाऱ्या मोर्च्यात सर्व सदस्यांनी सक्रिय भाग नोंदवावे असे आवाहन करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात शहीद स्मारक उभारण्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बैठक आयोजित करण्याचे बहुमताने ठराव घेण्यात आले.सभेचे प्रास्ताविक व सूत्र संचालन जिल्हा सचिव गिरधारी सोनेवाने यांनी केले.सदर सभा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर कापगते,जिल्हा सहसचिव रमेश रहांगडाले,कोषाध्यक्ष नाभिकमल चौधरी कोषाध्यक्ष यांनी सहकार्य केले.