मग्रारोहयो योजनेचा लाभ प्रत्यके गरजूंना मिळेल असे नियोजन करा – आ. विजय रहांगडाले यांचे निर्देश

0
21

तिरोडा:– महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे सदर योजना योग्यरित्या कार्यन्वित होवून त्याचा लाभ प्रत्येक गरजूंना मिळावा याकरिता तालुका पातळीवर समिती नेमण्यात येते व या समितीचे अध्यक्ष त्या विधानसभा क्षेत्रातील विधानसभा सदस्य असतात तिरोडा तालुक्यातील रोजगार हमी तालुका समितीची सभा तहसील कार्यालय तिरोडा येथे संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने तिरोडा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत ४०७२ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली असून त्यापैकी २८१६ कामे सुरु करण्यात आली व ९९४ कामे पूर्ण झालेली असून १८२२ कामे अपुर्ण आहेत याचा आढावा घेण्यात आले तसेच मग्रारोहयो अंतर्गत नाला सरळीकरणाची कामे समाविष्ट करण्याबाबत आमदार महोदयांनी निर्देश दिले असून सदर कामे विभागांतर्गत करण्यात यावी असे सूचित केले त्याचप्रमाणे लघु सिंचन विभागातर्फे तळाव खोलीकरण करून गाळ काढण्याचे कामे घेण्यात यावीत असेही निर्देश देण्यात आले सोबतच दक्षता समितीची बैठकही घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील गरजूंना नवीन रेशन कार्ड बनविणे ज्या लाभार्थ्यांना रेशन मिळत नाही अशा लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळवून देणे, याकरिता प.स.क्षेत्रनिहाय कॅम्प घेण्याबाबतचे निर्देश आमदार महोदयांनी दिले यासोबतच मागील २ दिवसाआधी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या धानपिकाचे पंचनामे करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले या आढावा सभेला प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा समिती अध्यक्ष विजय रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष, प.स.सभापती कुंता पटले, समिती सदस्य वंसत भगत, मदन पटले, रमेश कोकुडे, शुषमा कावळे, संध्या भरणे, माया रहांगडाले, एकनाथ सपाटे, खडकसिंग जगणे, मनोहर बुद्धे, प्यारेलाल पटले, रामप्रकाश पटले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार गजानन कोकडे, लघु पाटबंधारे विभाग उपभियंता गोवर्धन बिसेन, पुरवठा निरीक्षक जीवन राठोड, सा.बा.उपविभागीय अभियंता अनिल रहांगडाले, तालुका कृषी अधिकारी चव्हाण, सहा.गटविकास अधिकारी शितेश पटले, क.अभियंता वामन चव्हाण, गोंदिया पाटबंधारे विभाग उपविभागीय अभियंता एस.डी.पटले, व वन विभागाचे प्रमुख उपस्थित होते.