तिरोडा– महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना एन जी पी 5768 च्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व आमदारांच्या निवासस्थानासमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्यानिमित्त गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा निवासस्थानी समोर आंदोलन सुरू असताना आमदार विजय रहांगडाले यांनी आंदोलनाला भेट देऊन सर्व मागण्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी तारांकित प्रश्नांमध्ये पहिलाच प्रश्न त्यांनी ठेवण्यात आलेला आहे असे सांगितले. आकृतीबंधच्या विषयावर जिल्हा परिषदेचे सिईओ अनिल पाटील यांना आमच्या समोरच फोन करून आजचे आज अहवाल पाठवण्यात यावे असे निर्देश दिले. संगणक परिचालक संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने सर्व संगणक परीचालकांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश पटले, उपाध्यक्ष मनोजकुमार हरिणखेडे, जिल्हा उपाध्याक्ष तोलीराम नेरकर, संपर्क प्रमुख कमलेश अनवादे, दिनेश पटले, हेमंत उके, रोहित पांडे, नितीन तुरकर, उमेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.