नागपूर हिवाळी अधिवेशनावर आदिवासींचा लाँग मार्च

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची पत्रकार परिषदेत माहिती:- ११ डिसेंबर रोजी धडकणार मोर्चा.*

अर्जुनी मोर – आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर नाशिक ते नागपुर असा पैदल लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे विदर्भ सहसचिव साहिल अरविंद मडावी यांनी बुधवारी अर्जुनी मोर येथिल पत्रकार परिषदेत दिली.

मागण्या –
1) धनगर जात किंवा कोणत्याही जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये
2) धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करा
3) धनगर जात व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे तो हिवाळी अधिवेशनात जाहीर करून जनतेसमोर अनावा
4) पेसा ची पदभरती करण्यात यावी
5) 2017 ची रखडलेली 12500 पदांची विशेष पदभरती करण्यात यावी
6) माननीय सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या 6 जुलै 2017 चे निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी
7) sbc मधील कोळी समाजासाठी आदिवासींचा लाभ देण्यासाठी मुख्यमत्र्यांनी स्थापन केलेली समिती बरखास्त करण्यात यावी
8) वसतिगृहांतील विद्यार्थ्याना आहारासाठी असलेली डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी अन्यथा महागाईमुळे 10 हजाराने रकमेत वाढ करण्यात यावी
9) पंडीत दिनदयाळ स्वयम योजनेचे पैसे विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यावर 3 महिनेचे अगोदर मिळावे व त्या रकमेत महागाईमुळे 15 हजाराने वाढ करण्यात यावे
10) पंडीत दिनदयाळ स्वयम योजनेचा पैसा आदिवासी विभागातून धनगरांच्या विद्यार्थ्याना देण्यात येऊ नये
11) शबरी वित्त व महामंडळ नाशिक यांच्याकडून राज्यातील आदिवासी बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी 10 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे
12) ज्या आदिवासी कलाकारांनी नृत्य, कलापथक यांनी आदिवासी जमातींची ओळख, कला, अस्मिता,अतित्व टिकवून ठेवली त्या कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे
13) तालुका ,जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी मुला मुलींची वस्तीगृह संख्या वाढवावी
14) सांगवी शिरपूर येथील 200 चे आसपास आदिवासी मुलांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे
15) मणिपूर चे घटने संदर्भात झालेल्या आंदोलनावेळी सटाणा येथील आदिवासी मुलांवर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे.या व इतर समस्या साठी होणाऱ्या नाशिक ते नागपूर लाँग मार्च मध्ये आदिवासींच्या मागण्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून लक्ष्य वेधण्यात येणार असल्याचे यावेळी साहिल मडावी ( विदर्भ सहसचिव) अ. भा. आ. वि. प. यांनी सांगितले यावेळी प्रामुख्यानं जिल्हा अध्यक्ष गोंदिया मा. मोहित भलावी तालुका अध्यक्ष सडक/ अर्जुनी निकेश प्रधान देवानंद कुंभरे प्रसिद्धी प्रमुख उपस्थित होते.