मॉडेल कॉन्व्हेंट अँड सायन ज्युनिअर कॉलेज गोरेगाव मध्ये महापरिनिर्वाण दिवस उत्साहात

0
2

गोरेगाव :- मॉडेल कॉन्व्हेंट अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज गोरेगाव मध्ये सहा डिसेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सौ सी पी मेश्राम हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर संस्था संचालिका सौ.एस.आर.कटरे, प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले,पर्यवेक्षिका कुमारी एस.डी.चीचामे,टी.आर.पटले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे व सामूहिक गीत सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सौ सी.पी.मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. साहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी कल्याणी बिसेन व चिन्मय टेंभुर्णे तर आभार वंशिका गजभिये हिने मानले. कार्यक्रमाला यशश्विरित्या पार पडण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.