धापेवाडा उपसा सिंचन १९०० हेक्टर जमिनीला रबीपिकाकरिता पाणी मिळणार

0
25

तिरोडा:- धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी लाभक्षेत्रातील दरवर्षी देण्यात येत असून रबी हंगाम २०२३-२४ चे पाणी नियोजनाबाबत आज उपसा सिंचन कार्यालयात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने सद्यास्थितीत ३७.३९८ द.ल.घ.मी.पाणीसाठा असून याद्वारे कवलेवाडा ५०० हे.आर., चिरेखणी २६० हे.आर., बेलाटी खुर्द २१० हे.आर., मांडवी १३० हे.आर., मुंडीपार २२५ हे.आर., सालेबर्डी ९० हे.आर., सोनोली २५ हे.आर.,बिरोली ७५ हे.आर., भंबोडी ७५ हे.आर., चांदोरी बूज. ९० हे.आर., पुजारीटोला ४५ हे.आर., मरारटोला १२५ हे.आर., बेलाटी बूज. ५० हे.आर., असे एकूण १९०० हे.आर जमिनीला रबी धानपिकाकरीता उपसा सिंचनचे पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने जि.प.सदस्य किरण पारधी, कार्य.अभियंता अंकुर कापसे, उपभियंता प्रणय नागदिवे व लाभक्षेत्राअंतर्गत येणा-या गावातील सरपंच व शेतकरी उपस्थित होते.