आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवाळी अंक प्रदर्शनीचे आयोजन

0
11

गोरेगाव -दि.०६/१२-तालुक्यातील मोहाडी येथील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे ०६ डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवाळी अंक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले तर अंक प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटक मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे,उपाध्यक्ष जे.जे.पटले, सदस्य हिरालाल महाजन,देवदास चेचाने,तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले,पोलिस पाटील राजेश येळे, माजी उपसरपंच श्रीराम पारधी,जियालाल राहांगडाले, शिवराम मोहनकार, योगेश्वर पटले,मोहनकिशोर मौदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपली राज्यघटना घडविण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्तीमत्व असणारे समाजसुधारक व अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, त्याचा स्मूर्तीदिन ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
आपला सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक विकास कसा करायचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे सामान्य ज्ञान व जनरल ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचन करने काळाची गरज आहे. अंक प्रदर्शनी मधुन प्राप्त करावे असे आवाहन केले
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रवीण ठाकूर यांनी केले यावेळी कार्यक्रमात गावातील नागरिक व वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.