शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात शेतकरी मेळावा

0
21

अर्जुनी मोर-आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 निमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी कार्यालय अर्जुनी /मोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 डिसेंबर २०२३ शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी माननीय रुपेश कुमार मेश्राम मंडळ कृषी अधिकारी यांनी पैष्टीक तृणधान्यची लागवड व त्यांचे आहारातील महत्त्व यावर उपस्थित शेतकरी बांधव व भगिनींना मार्गदर्शन केले .तसेच माननीय विलास कोहाटी बी. टी. एम आत्मा अर्जुन /मोर यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सेंद्रिय शेती यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तसंच परिसरातील प्रगतिशील शेतकरी ललित सोनवणे व नितीन पाटणकर यांनी उपस्थितांना आपले अनुभव विशद केले .तसंच  पंकज सूर्यवंशी कृषी पर्यवेक्षक अर्जुनी /मोर यांनी कृषीविषयक योजनांची माहिती उपस्थितांना दिली व त्याच बहुसंख्य शेतकऱ्यांनी फायदा घ्या असं आव्हान केले .तसंच महाविद्यालयाची प्राचार्य प्राध्यापक ईश्वर मोहुरले यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आपलं महाविद्यालय सदैव सज्ज असून शेतकरी मेळाव्याचे महत्त्व विशद केले .संस्थेचे अध्यक्ष माननीय लुणकरणजी चितलांगे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रयोगात्मक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा व प्रोत्साहन दिल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत बोरकर वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तरुणांना 2023 निमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या उपक्रमाचे महत्त्व विशद केले .कार्यक्रमाचे संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी उत्कृष्टरित्या केलं तसंच आभार प्रदर्शन प्रा. अंकित नाकाडे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक कैलास लोखंडे ‍, हर्श्र्वर्धन नंदागवडी ,तनुजा कपगते,साक्षी मेंढे ,नेहा राऊत, कीर्ती नाकडे, वैष्णवी बोरकर, पौर्णिमा झोडे ,गुंजन खडके, स्नेहल ब्राह्मणकर, यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच कार्यक्रमाला बहुसंख्येने परिसरातील शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते.