विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

0
52

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात गट न. १६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.हा वाघ शिकारीच्या शोधात शेतात आला आणि विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला. यावेळी तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार वन पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विहिरीत पडलेल्या वाघाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. मृत वाघ हा नर असून अंदाजे वय अडीच वर्षाचे आहे.ब्रम्हपुरी वनविभागचे प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक एस.डी.हजारे, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविदपुर क्षेत्रसहाय्यक आर. एस. गायकवाड, तळोधीचे क्षेत्र सहायक मने, नेरीचे क्षेत्रसहाय्यक रासेकर, वनरक्षक श्रीरामे, बंडू धोतरे एन.टि.सी.ए., मानद वन्य जीवरक्षक विवेक करंबेळकर, पंकज माकोडे एन.जीओ. यश कायरकर, पशुवैद्यक डॉ. खोब्रागडे, डॉ. ममता वानखेडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. यावेळी तळोधी बा. पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तसाठी उपस्थित होते. विहिरीत पडलेल्या वाघाला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती. सावरगांव येथील रोपवाटीकामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.