अर्जुनी मोर.-तालुक्यातील बोंडगाव देवी क्षेत्राचे जि.प.सदस्य तथा गटनेते लायकराम भेंडारकर यांचे विशेष प्रयत्नातून खांबी/ पिंपळगाव येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन ता.2 करण्यात आले.
-खांबी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परिसरात स्वच्छ भारत मिसन अंतर्गत सौचालय बांधकाम तिनं लक्ष रुपये, जिल्हा परिषद स्तर १५ वा.वित्त आयोग अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम चार लक्ष रुपये मंजूर असून सदर कामांचे भूमिपूजन लायकराम भेंडारकर गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य गोंदिया यांच्या शुभहस्ते सौ.निरुपाताई बोरकर सरपंच खांबी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी तुलाराम खोटेले उपसरपंच, रविंद्र खोटेले माजी सरपंच, हेमराज फुंडे,नेमीचंदजी मेश्राम पोलिस पाटील,रेविचंद फुंडे अध्यक्ष तंटामुक्त गाव,धनलाल शिवणकर, प्रियांका खोटेले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शुभंम बहेकार ग्रामपंचायत सदस्य,रुतण लोणारे ग्रामपंचायत सदस्य,नामेस्वर खोटेले अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, पुरुषोत्तम डोये, ममता मेश्राम ग्रामपंचायत सदस्या, मा.नागपूरे सर,विकास डूंमरे, सदानंद भोंडे,व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.