अवाढव्य कर आकारणीच्या विरोधात आज जन आक्रोश मोर्चा

0
6

अर्जुनी मोर. :अर्जुनी मोर नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या विरोधात मालमत्ता व इतर कर विरोधात आज दि.३ जानेवारी २०२४ ला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण अर्जुनी मोर. बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा व्यापारी संघटन व नगरवासी नागरिक कृती समिती अर्जुनी मोर. यांच्या वतीने देण्यात आलेला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारानुसार अर्जुनी मोरगावला ग्रामपंचायत होती. पण शासनाच्या आदेशाने या गावाला नगरपंचायतीचा दर्जा देऊन नगरपंचायत झाली. पण नगरपंचायतने विशेष कोणत्या सुविधा न देता बेसुमार नवीन कर वसुलीचे नोटीस सहरवासीयांना दिले आहेत. तसेच करा संबंधी सुनावणी करून प्रक्रिया पूर्ण करून पेपरला जाहीर सुद्धा केले आहे. एवढी अवाढव्य वाढ कोणीही नागरिक व व्यापारी सहन करू शकत नाही .आणि नगरपंचायत सक्तीची वसुली करण्याची कारवाई करण्याच्या तयारी करत आहे. शासनाचे अधिकारी मुख्याधिकारी नगरवासीयांचा विचार न करता मोठमोठ्या महानगराचे टॅक्स मालमत्ता कर चे दर या नगरपंचायतीला लावून पैसा शासन दरबारी नेण्यासाठी आमच्या अर्जुनी ग्रामवासियांवर अन्याय करून लूट करण्याचा माणस दिसत आहे. तरी या मालमत्ता कर वाढीला विरोध करण्यासाठी सर्व नगरवासी महिला पुरुष तसेच व्यापारांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, व सर्व लहान मोठे किरकोळ भाजीपाला हॉटेल तसेच फेरीवाले यांनी मोर्चात सहभागी होऊन संपूर्ण दिवस आपापली दुकाने बंद ठेवून सकाळपासून मोर्चात सामील होऊन सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी संघटन व नगरवासी नागरिक कृती समिती अर्जुनी मोरच्या वतीने करण्यात आले आहे. सदर मोर्चा स्टेट बँक ऑफ इंडिया चौक येथून सुरुवात होणार असून दुर्गा चौक नगरपंचायत कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. या संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद व जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लुनकरण चितलांगे ,उपाध्यक्ष दादाभाऊ फुंडे, सचिव घनश्याम हातझाडे व अन्य सदस्यांनी केले आहे.