34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ तुमच्या संस्करावरून शाळेची ओळख होते : माजी मंत्री राजकुमार बडोले

तुमच्या संस्करावरून शाळेची ओळख होते : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
30

blank

 सडक अर्जुनी, दि. ०7 जानेवारी : तुमच्या संस्कारावरून तुमच्या शाळेची ओळख होते. कारण शाळेत मिळणारे शिक्षण जसे असेल. तसे विद्यार्थ्यांचे संस्कार घडतात. आणि त्या वरून शाळेची ओळख दिसून येते. असे माजी मंत्री राजकुमार बडोले हे सौंदड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत वार्षिक स्नेसंमेलनात मंचावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले विज्ञान ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी होणारे बदल तुमच्या लक्ष्यात येईल. कोळसा हा कार्बन पासून बनला आहे. तर हिरा देखील का कार्बन पासून बनला आहे. मात्र दोघात खूप फरक आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही ठरवल तर ये शक्य होणे कठीण नाही. आपल्याला काय व्हायचे आहे. ते आपल्या जिद्दिवर अवलंबून असते. तुम्ही या देशाचे पंतप्रधान देखील होऊ शकता. ते अशक्य नाही. सावित्री बाई फुले यांनी कठीण परिश्रम करून आपल्याला शिक्षणाचे अधिकार मिळुन दिले आहे. त्या मुळे आपण आता कितीही शिकू शकतो. असे मत त्यांनी मंचावरून वेक्त केले. मुख्याध्यापक सुनील भिमटे यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. तर सेवा निवृत्त सह्यक शिक्षक लोमेश रहांगडाले यांचे देखील यावेळी सत्कार करण्यात आले. दि. ३ ते ५ या असे तीन दिवसीय स्नेसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल सौंदड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजेत्या माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अशोक लंजे, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, सरपंच हर्ष मोदी, ग्रा. प. सदस्य रंजना भोई, माजी प.स. सदस्य मंजू डोंगरवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते