राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त नमाद महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

0
11

गोंदिया, दि.13 :  ‘राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त’ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जिल्हा वकील संघ व नमाद महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया येथे करण्यात आले होते.

        कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया सकलेश पिंपळे उपस्थित होते. नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा महाजन, प्रा.डॉ.सुयोग इंगळे (विधी विभाग प्रमुख), प्रा.डॉ.उमेश उदापुरे, प्रा.डॉ.योगराजसिंह बैस यांचेसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       न्यायाधीश पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना लिगल ॲडची सहायता कशी घेता येईल या विषयावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करण्याकरीता प्रोत्साहित केले. युवा वर्ग हा भारताचा कणा असून त्यांनी जर प्रामाणिकपणे वाटचाल केली तर भारत देश हा जगात अग्रगण्य राहणार. तसेच राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांना जर आजचे युवा वर्गानी आत्मसात करुन त्याप्रमाणे वाटचाल केली तर भारत देशाला पुन्हा एकदा सुराज्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. माता-भगिनींना भयमुक्त वातावरणात वावरतांनी दिसण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

       प्राचार्या डॉ.महाजन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावे, शिक्षकांनी दिलेले स्वाध्याय करुन यावे तसेच प्राध्यापकांचे, वडीलधाऱ्यांचे एैकावे व भविष्यामध्ये तुम्हाला काय बनायचे आहे याचा ध्येय समोर ठेवून खुप परिश्रम करुन अभ्यास करावे व आपल्या आई-वडिलांचे नाव लौकीक करावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.उमेश उदापुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.अंबादास बाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचारी अधीक्षक पी. बी. अनकर, पी. एन. गजभिये, एल. ए. दर्वे, के. एस. चौरे, आर. ए. मेंढे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.