शिक्षणाधिकारी साहेब आत्ता तरी जागे व्हा……हे काय चाललंय

0
108

प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी कनिष्ट प्रशासन अधिकारी विरोधात मैदानात

गोंदिया,दि.17ः गोंदिया जिल्हा परिषद एकेकाळी आएसओ नामाकंन प्राप्त जिल्हा परिषद म्हणून गणली जायची.आज तो नामांकन जिल्हा परिषदेने कायम टिकवलेला नसला तरी लागलेल्या ठप्यावर अनेक प्रश्नचिन्ह कामकाजातून उपस्थित होऊ लागलेत.त्यातच प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये यांच्या कार्यप्रणालीवरच आत्ता प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षणाधिकारी साहेब आत्ता तरी जागे व्हा…. अशी म्हणायची वेळ त्यांच्याच शिक्षण विभागातील कर्मचारी वर्गाने आणल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीयं.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांच्याविरुध्द त्याच कार्यालयातील सर्वच कर्मचारी वर्गाने एकत्र येत अग्रवालांना हटवा किंवा आम्हाला तरी हटवा अशी मागणीच निवेदनातून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याकडे 12 जानेवारी रोजी केली.त्या निवेदनावरुन सौरभ अग्रवाल हे आपले कार्यालयीन काम पार न पाडता मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी व पदाधिकारी यांच्या मागेपुढे फिरुन आपल्यालाच कसं सगळं येतयं हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे व त्यानी केलेल्या नियोजनामुळे अनेक  कार्यक्रमांना फटका बसल्याचेही दिसून आले.तरीही शिक्षणाधिकारी यांनी त्यांना तंबी देत कनिष्ठ प्रशासन  अधिकारी पदाकरीता असलेल्या कामकाजाकडे लक्ष द्यायला कधी सांगितलं असेल असं वाटत नाही.त्यामुळेच की काय अखेर त्या विभागातील इतर कर्मचारी ज्यांच्यावर यांच्यामुळे कामाचा व्याप वाढला त्यातच संभाषणांतील भाषेमुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाला कंटाळून अखेर अग्रवालांनाच विभागातून हटविण्यासंदर्भातील मागणीचे निवेदन सादर केले.एका विभागातील सर्व कर्मचारी एखाद्या आपल्याच विभागातील कर्मचारी विरुध्द एवढ्या मोठया प्रमाणात एकत्र येत आंदोलनाचा इशारा देण्याची जिल्हा परिषदेतील ही पहिलीच वेळ.आत्ता अधिकारी व पदाधिकारी याकडे कुठल्या नजरेनं बघतात आणि वाद कसं संपवतात याकडेंच लक्ष लागले असले तरी शिक्षणाधिकारी यांच्या आपल्या कार्यालयाकडे नसलेले लक्ष हे स्पष्ट या माध्यमातून मात्र नक्कीच समोर आलयं हे या शिक्षणाधिकारी महोदयांच यश की अपयश म्हणायचं हेच कळेनासे झाले आहे.

दरम्यान कनिष्ट प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील कर्मचारी हे दिलेले काम वेळवर करीत नसल्याने कामाचा व्याप वाढलेला आहे.पदोन्नती,लेखा आक्षेपसह इतर अनेक कामे मोठया संख्येत प्रलबिंत असून कर्मचार्यांनी ही कामे आधीच केली असती तर आज त्यांच्यावर कामाचा ताण आलेला नसता,आपण रात्री  उशीरापर्यत कार्यालयात हजर राहून काम करीत आहोत,मात्र कर्मचारी आपल्या कामाप्रती सजग नसून आपण कुठलाही त्रास देत नाही.