Home विदर्भ गोंदिया जि.प.शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती

गोंदिया जि.प.शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती

0

गोंदिया,दि.9-गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेल्या परंतु यावर्षी झालेल्या पारदर्शक बदल्यांना शिक्षक संघटनांच्या काही शिक्षकांनी निव्वळ आपल्याला गोंदिया या मुख्यालयापासून आणि काही तालुकामुख्यालयाच्या गावाजवळच्या शाळेपासून मुकावे लागल्याने प्रशासकीय बदल्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांच्याकडे धाव घेतली होती.त्यावर आमदार रहागंडाले यांनी शिक्षक संघटनाकडून मिळालेल्या निवेदनाच्या आधारे ग्रामिवाक मंत्री पंकजा मुंडे व ग्रामविकास सचिवाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे आज गुरुवारला दि.9 ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी जि.प.मुख्य कार्याकारी अधिकारी गोंदिया व विभागीय आयुक्त यांना सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत बदली प्रकियेस व निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला स्थगीती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.या आदेशामुळे शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र असले तरी काही शिक्षकामुळे मात्र ज्यांना यावेळी जवळच्या शाळा मिळाल्या पतीपत्नी एकत्रीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले.देवरी,सालेकसा,आमगाव,अर्जुनी मोरगाव येथील काही शिक्षकांना गोंदियासारख्या जिल्हा मुख्यालयात येण्याची संधी मिळाली अशावर मात्र राजकारणाच्या माध्यमातून नेतागिरी करुन आपली पोळी शेकणार्या काही शिक्षकामूळे अन्याय झाल्याची ओरड सुध्दा शिक्षक वर्गात आहे.

Exit mobile version