Home विदर्भ वाहनाच्या धडकेत पिल्लासंह अस्वलाचा मृत्यु

वाहनाच्या धडकेत पिल्लासंह अस्वलाचा मृत्यु

0

चंद्रपूर,दि.9- शहरालगत असलेल्या बायपास रोड वर आज पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अस्वलाचा आणि तिच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेली मादा ही अंदाजे ४ ते ५ वर्षाची असून तिचं पिल्लू ८ ते १० महिन्याच आहे. आज पहाटे प्लायवूड फैक्टरी जवळील उतारावर अस्वल आणि तिचं पिल्लू मृतावस्थेत असल्याचे काही लोकांना दिसून आले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. या बायपास रोडच्या दोन्ही बाजूला वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक विभागाचे जंगल आहे. त्यामुळे या मार्गावर वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र सर्वच प्रशासनिक यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वन्यप्राण्यांना नाहक जीव गमवावा लागतो आहे.

Exit mobile version