
गोंदिया- अयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठानपना आज झाल्याने शहरासह जिल्ह्यातील गावखेड्यात व तालुकास्थळावर नागरिक रामाच्या भक्तीत लिन झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.गावखेड्यासहं शहरातील विविध भागांत मंदिर, रस्ते, चौक, निवासस्थानांवर भगवे ध्वज, तोरण, झेंडे लक्ष वेधून घेत होते. सर्वत्र मिरवणुकांमध्ये जय श्रीरामाचा गजर एकू येत होता.गोंदियात प्रतिष्ठापनेनंतर महाआरतीही आयोजित करण्यात आली होती.यात माजी आमदार राजेंद्र जैन,प्रफुल अग्रवाल,निखिल जैन,व्यापारी संघटनेचे संजय जैन,विश्वजित वालिया,केतन तुरकर आदींचा सहभाग होता.
अयोध्येतील राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त गावखेड्यातील व शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता आणि सुशोभीकरण केले गेले. प्रतिष्ठापना दिनी सकाळपासून शहरात राम भक्तांनी मिरवणूक काढत जय श्रीरामचा गजर केला. सर्वत्र म्युझिक सिस्टम, डिजेवर रामावरील भक्तिगीते वाजत होती. शहरातील प्रसिध्द हनुमान मंदिर,दुर्गा मंदीर,रामदेवरा मंदीर,फुुलचूर येथील शिवधाम,रामनगर राम मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.शहरात निघालेल्या शोभायात्रेतील भाविकांकरीता ठिकठिकाणी महाप्रसाद विितरणाचे आयोजनही करण्यात आले होते.