माजी पालकमंत्री डॉ.फुके यांचे प्रयत्न..
गोंदिया- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात ग्रामीण भागातील शेतकरी संघटनांनी श्री.फुके यांची भेट घेऊन गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाच्या उत्पादनाबाबत चर्चा केली व कृषिपंप धारक शेतकऱ्यांना यापासून आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणाची दखल घेत माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी राज्याच्या ऊर्जा व उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करून आज 3 फेब्रुवारी रोजी राज्याच्या शेवटच्या टोकावरील नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर, कृषी पंपासाठी 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली.
या प्रकरणाची तातडीने दखल घेत प्रधान सचिवांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी दिलासा देऊन 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्याच्या सूचना तात्काळ सम्बंधित विभागाना दिल्याने शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे कृषी पंपांना 8 तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.