भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारालाच संधी-माजी आमदार कुथे

0
31

गोंदिया– भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये.मूूऴच्या स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी.तसेही आमचे विद्यमान खासदार सुनिल मेंढे हेच पहिल्या पसंंतीचे उमेदवार असल्याने मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कुथे यांनी व्यक्त केली.ते गोंदियातील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकांराच्या प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.पत्रपरिषदेला खासदार सुनिल मेंढे,भाजप जिल्हाध्यक्ष एड.येशुलाल उपराडे,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे,शहर भाजप अध्यक्ष अमित झा,महिला आघाडी प्रमुख भावनाताई कदम,जयंत शुक्ला यावेळी उपस्थित होते.

गोंदिया-भंडारा हा लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण असून भाजपकडे विद्यमान खासदारासंह इतर नेत्यांनीही लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांनाच उमेदवारी पक्षाकडे मागण्याचा अधिकार असून स्थानिक मतदारसंघातील रहिवासी असलेला उमेदवारालाच प्राधान्य दिले जाते.परंंतु पक्षाने काही ठरविले असल्यास पक्ष ज्यांना उमेदवारी जाहिर करेल त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहू असे खासदार सुनिल मेंढे म्हणाले.तर माजी आमदार कुथे यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आजपर्यंतची परंपरा ही स्थानिक उमेदवाराप्रतीच दिसून आलेली आहे.त्यामुळे स्थानिक उमेदवारालाच पक्ष संधी देईल पण सर्वानांच आपले शक्तीप्रदर्शन करायला मोकळीक असल्याचेही म्हणाले.संविधाननिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,अर्थतज्ञ अशोक मेहता,डाॅ.श्रीकांत जिचकार सारख्या महानुभवांना या मतदारसंघाने बाहेरील उमेदवार म्हणून नाकारल्याच्या इतिहास आहे.त्या इतिहासाला बदलण्याकरीता काही प्रयत्न करीत असतील तर त्यांना आम्ही थांबवूू शकत नसल्याचेही अप्रत्यक्षपणे कुथे यांनी सांगितले.

पक्षातील मातब्बर नेते  स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार उभा करतात आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावतात. स्थानिकचा उमेदवार निवडून आल्यास भविष्यात तो मोठा होईल आणि आपल्या शक्तिस्थळांना आव्हान देऊ नये अशी तजवीज केली जाते.   उमेदवार बाहेरून आयात करायचा. त्याला निवडून आणायचे, पाच वर्षे त्याच्या माध्यमातून सत्ता राबवायची. तो सोयीचा असेल तर त्याला पुन्हा संधी द्यायची, जड होत असेल तर पुन्हा दुसरा उमेदवार आयात करायचा आणि त्याला निवडून आणायचे असेच राजकारण राखीव मतदारसंघात नेहमीच दिसून येतात मात्र आता सर्वसाधारण मतदारसंघातही याचा शिरकाव झाल्याची चिंता नेत्यांच्या चेहर्यावरील भावनांतून दिसून येत होती.