समाजासाठी झटण्याची जिद्द सर्वांनी अंगिकारावी – सभापती संजय टेंभरे

0
27

* फुलचुर येथे चक्रवर्ती राजाभोज यांच्या जयंतीचे थाटात आयोजन
गोंदिया – जिल्ह्यात बहुसंख्यांक असलेला आपला समाज अजूनही काही विशिष्ट समाजाच्या मानसिक गुलामगिरीत गुरफटून आहे. समाजात अनेक प्रतिभावंत आहेत, मात्र समाजासाठी योगदान देण्याची मानसिकता नसल्याने आजही आपल्या समाजाचा हवा तेवढा विकास झालेला नाही. त्यामुळे समाजाचा विकास करायचा असेल तर समाजासाठी झटण्याची जिद्द सर्वांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
क्षत्रिय चक्रवर्ती पोवार समाज संघटन फुलचुर च्या वतीने राजाभोज जयंती महोत्सव व पोवार समाज मिलन समारोह दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी १५ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, पवार प्रगतिशील मंच अध्यक्ष ॲड. पृथ्वीराज चव्हाण, पंचायत समिती सदस्य स्नेहा गौतम, महिला समिती अध्यक्ष धनिषा कटरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण ठाकूर, डव्वा पोवार समाजाचे लिलेश रहांगडाले, ईशा गौतम, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पटले, अशोक हरिणखेडे, किरण ताई पटले, अंजू बिसेन, संतोष चौधरी, देवचंद बिसेन, सेलटॅक्स कॉलनी पोवार समिती अध्यक्ष एफ. सी. पटले, राहुल रहांगडाले, अनिता बिसेन, आनंद पटले, झामवांता बिसेन आदी उपस्थित होते.
सुरुवातीला चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समिती अध्यक्ष राजकुमार (पप्पू) पटले यांनी कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी सभापती मुनेश रहांगडाले, पवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अंबुले यांनी तर आभारप्रदर्शन सुभानराव रहांगडाले यांनी केले.
त्यानंतर मा भगवती देवी जागरण ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती अध्यक्ष राजकुमार (पप्पू) पटले, संघटन प्रमुख राजेश अंबुले, महारॅली प्रमुख सुभानराव रहांगडाले, यांच्यासह जय पटले, मनोज रहांगडाले, संजय चौधरी, भूपेंद्र बघेले, मनीष गौतम, मनीष बघेले, गोवर्धन बघेले, दुर्गाप्रसाद बिसेन, महेंद्र पारधी, सतीश गौतम, सुनील कटरे, संतोष पटले, गजानन बघेले, महेश कटरे, चंद्रकुमार अंबुले, संदीप येडे, राघव पटले, संतोष बिसेन, नाभिकमल चौधरी, राजकुमार पटले, सीताराम बिसेन, मोनू हरिणखेडे, प्रतीक बिसेन, गोपाल बिसेन, सुनील पारधी, लक्ष्मीप्रसाद पारधी, ऋषिपाल बिसेन, अनिल रहांगडाले, जयेश बिसेन, राकेश हरीणखेडे, आनंद येडे, धीरज कटरे, दिलीप बिसेन यांच्यासह इतर समिती सदस्यांनी सहकार्य केले.