विद्यार्थ्यांनी अंगभूत गुण ओळखून कौशल विकासाकडे लक्ष देणे आवश्यक-प्राचार्य डॉ. राजेश चांडक

0
14

अर्जुनी मोर. – विद्यालयाचा उद्देश केवळ पाठ्यक्रम पूर्ण करण्यापुरते राहिलेले नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन कौशल विकासाच्या माध्यमाद्वारे शिक्षण देणे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्यातील अंगभूत गुणांचा विकास करणे आवश्यक आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल विकासावर भर द्यावे असे प्रतिपादन एस. चंद्रा महिला महाविद्यालय साकोलीचे प्राचार्य तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर राजेश चांडक यांनी व्यक्त केले
ते जय दुर्गा विद्यालय गौरनगर येथे विभागीय स्तरावर कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कृत प्राध्यापक भुवेंद्र चव्हाण यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक आहे त्याद्वारे परिसरात निवासी शिबिर आयोजित करून विद्यार्थी व पालक यांच्यात विविध उपक्रम राबविले जातात व जनजागृती केली जाते.
कार्याची पावती म्हणून नुकतेच विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी शिक्षक भूवेंद्र चव्हाण यांना विभाग स्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.दिनांक १६ फेब्रुवारी ला पार पडलेल्या कार्यक्रमात संस्था तसेच शाळेतर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे,मोरारीजी घोडेस्वर उपसरपंच मांडोखाल,दुर्योधन मैंद माजी पंचायत समिती सदस्य, हेमके मुख्याध्यापक जिल्हा परिषद विद्यालय गौरनगर, किशोर जी ब्राह्मणकर सरपंच जानवा,मधुकर ठाकरे सरपंच बोरी, आनंद तिरपुडे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती येगाव,सुरेश राऊत, तानाजी कोरे येगाव,खुशाल धकाते कोरेगाव गुरुदेव अवसरे कोरेगाव, चुडी राम राजगिरे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती समिती को, आसाराम धकाटे कोरेगाव, विवेक केळझरकर कोरेगाव,भैयाजी पाटील नाकाडे आसोली, भोजराज नाकाडे दयाराम काळसर्फे असोली,राजू चव्हाण पोलीस पाटील मांडोखाल वसंत लांडगे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मांडोखाल,देवराम लांजेवार डॉ. धर्माजी नाकाडे टोला रूपचंद गाणे सेवानिवृत्त पोस्ट मास्टर टोला,ओम प्रकाश पाटील नाकाडे टोला, हेमराज ब्राह्मणकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव विठ्ठल पुस्तोडे मांडोखाल, परिमल मंडल सेवानिवृत्त शिक्षक गौरनगर, सुकुमार मिस्त्री विठ्ठल इत्यादी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते
सत्काराला उत्तर देताना भूवेंद्र चव्हाण यांनी संस्था व शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली व राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक प्रमुख म्हणून कार्य करण्यास दिलेल्या संधीबद्दल सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे संचालन संगदीप कांबळे यांनी केले तर प्रवीण शिंगाडे यांनी मान्यवरांचे आभार मानले.