
गोंदिया ता.19 फेब्रुवारी :-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समिती 2024 चे अध्यक्ष जी.एल.तिरपुडे यांनी विनम्र अभिवादन केले. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ‘अश्या घोषणा देऊन त्यांना नमन केले.
हा कार्यक्रम येथील मनोहर चौकात आयोजित करण्यात आला. उल्लेखनीय असे की छत्रपतींचा हा पुतळा नुकत्याच ता.17 फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठापित करण्यात आला.जयंतीचे कार्यकर्ते आज सकाळ पासूनच अभिवादन कार्यक्रमात उपस्थित झाले होते. कार्यकर्त्यांमध्य प्रामुख्याने उपाध्यक्ष अरविंद भावे, माजी अध्यक्ष प्रा.सुरेश नंदेश्वर,मेश्राम बालमुकुंद फुले, मच्छिन्द्र भेलावे,इंजि राकेश वैद्य, एलआयसीचे डहाट उपस्थित होते. यावेळी ऋषिका राकेश वैद्य ह्या इयत्ता 5 वित शिकणाऱ्या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारावर प्रकाश टाकणारे भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन करून पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सर्वांचे आभार मानले.