शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

0
1

मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव आदी उपस्थित होते.

शिवजयंती उत्साहात साजरी; महावितरणचे महाराजांना अभिवादन!
नागपूर, दि.19 फेब्रुवारी 2024:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महावितरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या कार्यालयाच्या प्रांगणात  शिवरायांच्या प्रतिमेला प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह अधीक्षक अभियंता हरीश गाजबे, सहमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सहायक महाव्यवस्थापक ( मानव संसाधन ) प्रदीप सातपुते, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे  यांनी देखिल महाराजांना अभिवादन केले. यावेळी महावितरण आणि महानिर्मितीचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या आदर्शांवरून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन       

वाशिम,: स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात हा जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, भूमी अभिलेखचे अधीक्षक शिवाजी भोसले, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.