अर्जुनी मोर.-तालुक्यातील कवठा या गावांमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग अर्जुनी मोरगावच्या वतीने एग्रीकिंग फार्मर प्रोडूसर कंपनी नवेगावच्या माध्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कवठा या गावांमध्ये आज जैविक शेती शेतकरी प्रशिक्षण पार पडला. सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना फार्मर प्रोडूसर कंपनीचे मुख्य संचालक किशोर तरोणे यांनी सांगितले, की नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कवठा या गावाची निवड करण्यात आली.शेतकऱ्यांनी या अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणाचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. शेतीतील वाढलेले खर्च व कमी होणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बजेट ढासळलेली आहे. सुभाष पाळेकरांची झिरो बजेट शेती ही नैसर्गिक शेतीचा एक भाग असून आता शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करणे काळाची गरज ठरली आहे. ही नैसर्गिक शेती आपल्या शेतात येणारा खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल व त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येईल. त्याचबरोबर नैसर्गिक शेती केल्यामुळे उत्कृष्ट जैविक आहार जनतेला आपण विषमुक्त अन्न दिल्यामुळे ही एक प्रकारची देश सेवा घडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीत मोठ्या प्रमाणात भाग घेऊन प्रकट पाटील सूचनानुसार शेती करावी व आपल्या जीवनात बदल घडवून आणावा. या कार्यक्रमात कृषी विभागाने दशपर्णी अर्क व जीवामृत कसे तयार करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कवठा गावच्या ग्राम पंचायत उपसरपंच सरिता लंजे, प्रमुख मार्गदर्शक किशोर तरोणे, भागवत डोंगरवार, मुनेश्वर परशुरामकर, सुरेश परशुरामकर, सौ.भागृता मडावी ,सौ रजनी लंजे, अर्जुन नागपुरे, अनिलजी लंजे, भोजराज लंजे ,अशोक मुंगूसमारे, निलेश्वर लंजे, देवराम कोडापे ,वासुदेव कापगते ,वामन दखणे ,प्रदीप मेश्राम चोप्राम लंजे ,चंदन लंजे ,कालिदास पुस्तोडे, ललित सय्याम इत्यादी गावकरी शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.