अर्जुनी मोर(सुरेंद्रकुमार ठवरे)– भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे वैभव व श्रद्धास्थान असलेल्या चारभट्टी ( पुयार )येथे भगवान हनुमानाचे जागृत मंदिर आहे. निसर्गाचे सानिध्यात असलेल्या या मंदिरात दोन्ही जिल्ह्यातील भाविकभक्त लाखोच्या संख्येनी दर्शनासाठी येवुन आपली मनोकामना पुर्ण करतात.मात्र या देवस्थानांत जायचे कुठुन हा भाविकभक्तासमोर मोठा प्रश्न आहे. दोन्ही जिल्ह्यातील भाविकभक्तांना जाणेयेणेसाठी पुरातन रस्ते तर आहेत.पण त्या रस्त्यांवरून चारचाकी, दुचाकी तर सोडा साधी सायकल व पायी चालने सुध्दा कठीण झाले आहे. एवढी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तेव्हा भगवान बजरंगबली आमच्या लोकप्रतिनिधींना या तिर्थक्षेत्रात जाण्यासाठी गुळगुळीत रस्ते बनवुन देण्याची सदबुध्दी दे असी भाविकभक्तांनी मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी चे प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांची पुयार चारभट्टी देवस्थानावर अफाट श्रध्दा आहे. वर्षातून दोनतिनदा नानाभाऊ येथे दर्शनासाठी येतात.या ठिकाणी मोठी यात्रा सुध्दा भरते. लाखोच्या संख्येनी भावीक दर्शनासाठी येतात.नवसाला पावणारा मारुती देवस्थान म्हणुन चारभट्टी देवस्थानची ख्याती आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुका व गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुका यांचे मधोमध घनदाट जंगलात आणी निसर्गाचे सानिध्यात एक जागृत देवस्थान म्हणुन चारभट्टी देवस्थानची ख्याती आहे. निवडणुकीच्या काळात जवळपास चे आणी दुरवरचे नेते मंडळी मारुतीच्या आर्शीवादासाठी व आपल्या विजयासाठी प्रचाराचा नारळ याच जागृत देवस्थानात फोडतात.साकोली विधानसभेचे आमदार नानाभाऊ पटोले हे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात.हा रस्ता साकोली व अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत येतो. नानाभाऊ पटोले यांचे साकोली विधानसभा क्षेत्रातील पुयार ते चारभट्टी देवस्थान पर्यंत रस्ता बनविलेला आहे. मात्र अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत चारभट्टी देवस्थान ते कोरंभीटाला पर्यंत रस्ता दुर्लक्षित आहे.पायी चालणारा भाविकसुध्दा रस्ता सोडुन जंगलातुन पायवाट काढुन मंदिरापर्यंत पोहचतो असी बिकट अवस्था या रस्त्याची झाली आहे. 2024 हा वर्ष निवडणुकीचा आहे. आतातरी चारभट्टी चा हनुमंत लोकप्रतिनिधींना रस्ता बनविण्यासाठी सदबुध्दी देईल का? असा प्रश्न भाविकभक्त विचारीत आहेत.