गोंदिया,दि.29- गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांथन यांनी रुजू होताच सर्वच विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.जल जिवन मिशन ची कामे येत्या मार्च महिन्यापर्यंत पुुर्ण करण्याचे उदिष्ठ त्यांनी कंत्राटदार व कर्मचारी यांच्यासोबत आयोजित कार्यशाळेत ठरवून दिले.
जिल्हा परिषदेतील विविध विभागांचा कामकाज कसा चालतो याचे सादरीकरुन दररोज विभागाप्रमुखाकंडूून करुन घेत आहेत.त्यातच बुधवार 28 फेब्रुवारीला मुकाअ एम.मुरुगानंथम यांनी चतुुर्थ श्रेणी कर्मचारी यांचीही कार्यशाळा घेतली.सोबतच जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सुरु असलेल्या जल जीवन मिशन योजनेचा आढावा सभागृहात घेतला.या बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता,पंचायत व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर,श्री.शणवारे हे उपस्थित होते.या बैठकीलाा वनविभाग,बांधकाम विभागाचे अधिकारी यांनाही बोलावण्यात आले होते.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे हे बैठकीला आँनलाईन उपस्थित होते.
विशेष म्हणजे जल जिवन मिशनचा आढावा घेतांना जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेल्या कंत्राटदारांनाचा बोलावून त्यांच्याकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेत कामात कुुठलीच कुचराई चालणार नाही अशा सज्जड दम दिला.सोबतच आधीच योजनेच्या अमलंबजावणीला उशीर झाल्याने योजनेचे काम वेळेच्या आत गुणवत्ता टिकवूून पुर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले.योजना राबवितांना कुठे अडचण येत असेल तर ती सोडवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.कंत्राटदाराचीही बाजूू समजूून घेतली गेली पाहिजे.गावातील नागरिकांचा विरोध होत असेल तर ग्रामसेवकांनी गावपातळीवर त्याचे समाधान करण्याचे निर्देश दिले.पंचायत समितीच्या बीडीओला सुध्दा जल जिवन मिशनच्या योजनेच्या कामाची पाहणी करण्याची सुचना केली. जल जिवन मिशनच्या आढावा बैठकीला पंचायत समितीचे गटविकास,ग्रामसेवक, कंत्राटदार,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता,अभियंता,जलजिवन मिशनचे कर्मचारी उपस्थित होते.